Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : वाळूने भरलेला डंपर पलटी, चालक ठार

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ नजीकच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर पलटी होवून झालेल्या अपघातात डंपर चालक जागीच ठार झाला.

बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या केबीनने पेट घेतल्याने डंपर जळून खाक झाला.ओणी येथून विलवडेकडे वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाळूने भरलेला डंपर नजीकच्या 25 ते 30 फुट खोल दरीत कोसळला.

दरम्यान या अपघातात चालक जागीच ठार झाला. अपघाताची तिव्रता एवढी होती कि डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. कंबरेखालील भाग डंपरमध्ये अडकला होता. तर धड वेगळे होवून बाहेर फेकले गेले.

अपघातानंतर डंपरच्या केबीन आणि ट्रॉलीचे दोन भाग होवून केबीन जळून खाक झाली.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशमन बंबाने पेट घेतलेला डंपर विझविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *