शृंगारतळी : दुचाकी घसरून दोनजण जखमी

banner 468x60

गुहागर विजापूर हायवे वरील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जवळ हॉटेल झायकासमोर दुचाकी घसरून दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

एकाची परिस्थिती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे सिविल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. हे तरुण गुहागर वरून चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील आहेत.

अभिषेक बांद्रे व प्रसाद बांद्रे अशी जखमी तरुणांची नावे असून अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना शृंगारतळि येतील ओक ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला रत्नागिरी सिव्हल येते पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईक ही शृंगारतळी मध्ये दाखल झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *