Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : रस्त्यात चुकीच्या पध्दतीने ठेवलेल्या गर्डरवर दुचाकी आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या गर्डरवर दुचाकी आदळून गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली.

महामार्गावर ठेवण्यात आलेले धोकादायक गर्डरवर यापूर्वी देखील दुचाकीस्वार आदळल्याची घटना घडली आहे. अनिल रामचंद्र घाडगे (30, खेरशेत-पुनर्वसन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अनिल घाडगे हा शनिवारी रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास आरवलीहून खेरशेत येथे घरी येत होता. मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने प्रवास करत असताना तो खेरशेत येथील टोल नाक्याठिकाणी आला.

त्याठिकाणी महामार्गाच्या ठेकेदाराने भलेमोठे गर्डर ठेवले असून गर्डरठिकाणी अंधार असल्याने याच गर्डरवर अनिल याची दुचाकी जोरदारपणे आदळली. या अपघातात अनिल याच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाली.

या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकाच्या हा अपघाताचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची कल्पना ग्रामस्थांना दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली.

मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या अनिलचा यातच मृत्यू झाला आहे. अनिल हा छोटी- मोठी कामे करुन आपले घरकुटूंब चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आई-वडील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *