Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : किरकोळ कारणावरून बाप-लेकाला मारहाण, जामगे मोहल्ल्यातील घटना

banner 468x60

दापोली तालुक्यातील जामगे मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून बाप-लेकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीत 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली.

यामध्ये बाप-लेख जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद मुजफ्फर असलम नागुठणे (34, जामगे मोहल्ला दापोली) यांनी दिली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास नागुठणे आपल्या घरी परत येत असताना त्या घरी जाण्याचा रस्ता गावातील 12 जणांनी अडवून धरला. त्या वेळेला बरकत तांबे याने ‘तू माझ्या बहिणीला शिव्या देतोस’ असे बोलून काठीने तसेच लाथ्या बुक्क्याने मारहाण केली.

तसेच नागोठणे याचे वडील असलम अहमद नागुठणे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुजफ्फर असलम नागुठणे, असलम अहमद नागुठणे (57) दोघे जखमी झाले.

याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात भादवि कलम 143, 147, 148, 149, 324, 341 नुसार बानू मुराद हवा, बरकत हुसेन तांबे, रमिज सिकंदर हवा, अहमद अकबर नागुठणे, अकबर अहमद नागुठणे, सादिका अकबर नागुठणे, अर्शिया

अकबर नागुठणे, मुराद अब्दुल रहमान हवा, मुसद्दीक कासिम हवा, तोहीद गणि नागुठणे, जमीर कादिर पेटकर, अरफाद शौकत हवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *