Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, हत्या केल्याचा संशय

banner 468x60

दापोलीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दापोली तालुक्यातील वणंद या गावात महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला असून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

या महिलेचं नाव भाग्यश्री लोवरे असून विवस्त्र अवस्थेतील मृतदेह तिच्या राहत्या घरातच आढळला आहे. नातेवाईकांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला असून या प्रकारामुळे दापोली तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

वणंद येथील लोवरेवाडीतील भाग्यश्री दशरथ लोवरे (50) या पतीच्या निधनानंतर घरी एकट्याच रहात असल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी कामानिमित्त मुंबई येथे राहत आहेत.

मात्र भाग्यश्री लोवरे या गावीच आपल्या घरी रहात होते. घर चावलण्यासाठी जवळच असलेल्या हर्णेलगत समुद्रकिनारी एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. मात्र मंगळवारी त्यांचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह त्यांच्या घरी सापडला. या बाबत त्यांचा मुलगा दर्शन दशरथ लोवरे याने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली असून भाग्यश्री लोवरे यांचा मृतदेह घरी सापडला,

त्यावेळी बाहेरचा दरवाजा व हॉलचा दरवाजा उघडा होता. त्याला आतून वा बाहेरून कडी लावण्यात आलेली नव्हती. आपली आई घरात एकटीच रहात असल्याने कधीही कडी न लावता झोपत नसे,

असेही त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले. यामुळे घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *