Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

राजापूर : तब्बल 1 कोटीची चोरी

banner 468x60

राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील पतसंस्था फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह १ कोटीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवार (दि.१४) सकाळी आकराच्या सुमारास उघडकीस आली.

मिठगावणे येथे श्रमिक पतसंस्था आहे. या पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी मंगळवारी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे शटर आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली.

त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना पतसंस्थेतील सामान असताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच पतसंस्थेतील रोख रक्कम आणि ९० लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी नाटे पोलिसांना याची माहिती दिली. नाटे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *