Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : किरकोळ कारणावरून पती-पत्नीला मारहाण, सुरेश जालगावकर, मयूर जालगावकरवर गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव रोहिदासवाडी येथे किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरेश जालगावकर व मयूर जालगावकर (जालगाव- रोहिदासवाडी) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश जालगावकर हे त्यांच्या घराच्या आवारात बसले तेव्हा त्यांचा भाऊ सुरेश जालगावकर याने तेथे येऊन मंगेश यास ‘तू माझ्या आंब्याच्या झाडावरचे आंबे का काढलेस’ असे बोलून जालगाव येथील मंगेश याला मारहाण केली.

त्यामुळे मंगेश याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी सुरेशने मंगेशला लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तेव्हा मंगेश याची पत्नी पूजा ही सोडवण्यासाठी पुढे आली असता सुरेशने तिला ढकलून दिले. त्यानंतर सुरेश व मयूर जालगावकर या दोघांनी तिला दगडाने मारहाण केली. यामध्ये पूजा जखमी झाली.

तसेच मंगेश याच्या घरावर दगड फेकून मारून त्याच्या घराचे नुकसान केले. तसेच सुरेशने घराचे कंपाउंड तोडून नुकसान केले व त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सुरेश जालगावकर व मयूर जालगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *