Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

BIG Breking रत्नागिरी : कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना अखेर निवडणूक चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाने ‘माईक’ चिन्हावर केलं शिक्कामोर्तब!

BIG Breking रत्नागिरी : कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना अखेर निवडणूक चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाने ‘माईक’ चिन्हावर केलं शिक्कामोर्तब!

banner 468x60

केंद्रीय निवडणूक आयोगाने कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना अखेर चिन्ह दिलं आहे. कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना नेमकं कोणतं चिन्ह मिळणार? याची उत्सुकता कोकणातील राजकीय वर्तुळात लागून राहिली होती.

अखेर ‘माईक’ चिन्ह शकील सावंत यांना मिळालं आहे. शकील सावंत यांनी अर्ज भरताना शिट्टी, माईक आणि अंगठी हे चिन्ह मागितले होते. अखेर मागितलेल्या चिन्हातील माईक हे चिन्ह त्यांना भेटलं आहे.

चिन्ह भेटल्यानंतर कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत आणि पक्षाचे संस्थापक ॲड. ओवेस पेचकर यांनी आनंद व्यक्त केलंय. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.

लोकसभा मतदार संघात सर्वच पक्षाकडून जोरात प्रचार सुरू असताना कोकणात आता तिहेरी लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून विनायक राऊत, कोकण प्रादेशिक पक्षाकडून शकील सावंत तर भाजपकडून नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे.

शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला असून चिन्ह नेमकं कोणता असेल याबाबत संभ्रम निर्माण झाला होता अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना अखेर चिन्ह दिलं आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे. त्यामुळे विविध मुद्यांवर बोलण्यासाठी शकील सावंत यांनी उद्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.

दिनांक 23 एप्रिल, 2024. वेळ – सकाळी 11 वाजता, ठिकाण , हॉटेल सावंत पॅलेस, बॅक्वेट हॉल येथे ही पत्रकार परिषद होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *