शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनीनाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेशशंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोरबंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 IPC कलम प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे.
या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपासगुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.
सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















