Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : खंडणी न दिल्याने सरपंचानेच केला चाकूहल्ला, सरपंच की गावगुंड

banner 468x60

दापोली तालुक्यातील अंजर्ले- पाडले गावच्या सरपंचाने केलेली खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने संरपंचाकडून एकावर चाकू हल्ला करण्यात आला.

ही घटना अंजर्ले- पाडले गावात गुरुवारी (दि.२८) सकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुभाष राजेंद्र लोणारी (वय ३६, दापोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंचाविरोधात दापोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजर्ले-पाडले या गावच्या सीमेवर शार्प स्किल इफ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या साईटवर सुभाष लोणारी हे लायझिंग हेड म्हणून काम पाहतात.

या साईडचे काम सुरू झाल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सतनाक हा साईडच्या कामाबाबत खंडणीचे स्वरूपात सीनियर ऑफिसर दिपेंद्र गुप्ता यांचेकडून पैसे घेत होता. दिपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचे काम हे सुभाष लोणारी हे सांभाळत आहेत.

(गुरुवारी) सरपंचाने लोणारी यांच्या साईडवर सुरू असलेल्या कामकाजाबद्दल खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली. लोणारी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सरपंच सतनाक याने फिर्यादी लोणारी यांना धमकी देत त्यांच्यावर चाकूने छातीवर व दंडावर वार केले. यामध्ये सुभाष लोणारी गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *