तालुक्यातील कळकवणे राजवाडा येथील दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. याप्रकरणी पालिसांनी शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी केली.
ज्यापरिस्थितीत या दाघींचे मृतदेह आढळले आहेत, त्यावरून घातपाताचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.
मात्र, मृतदेहांवर तसेच शरीरावर भाजलेल्या अवस्थेतील खुणा आढळल्याने या खुणा कसल्या आहेत, याचा शोध सुरू आहे. सोनाली राजेंद्र निकम (१५) आणि मधुरा लवेश जाधव (१५, दाघीही रा. कादवड, कातळवाडी, चिपळूण) नववीमध्ये शिकत होत्या.
शनिवारी दुपारी त्या येथील वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, काही वेळातच त्यादाघींचे मृतदेह नदीकिनारी तरंगताना दिसले.
त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना नदीच्या पाण्यातून बाहेर काढले. मधुरा जाधव हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर सोनाली निकम हिचा श्वासाच्छ्वास सुरू होता. तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तिला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच शिरगाव अलोरे पोलिसस्थानकाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दोघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेलानसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मृतदेह नदीत न सापडता नदीकिनारी सापडल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाजव्यक्त करण्यात येत आहे, तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा दाघींच्या शरीरावर नसल्याने अत्याचार झालेला नसल्याचेपोलिसांचे म्हणणे आहे. दाघींना
उष्माघाताचा अटॅक आला असावा का, याचाही शाळेध घेतला जात आहे. त्या दाघी ज्या शाळेतशिकत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांची रविवारी चौकशी करण्यात आली.रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एकपथक दिवसभर तपासात गुंतले आहे.
या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती समार येणार आहे. पोलिसांनी मात्र
संपूर्ण प्रकरणात मौन बाळगले आहे. मृतदेहांच्या शरीरावर काही जखमा आढळल्या आहेत. त्यावरून प्राथमिक अंदाजानुसार घातपाताचा संशय व्यक्त हाळेत आहे. त्या खडकावर पडलेल्या आढळल्याने त्या जखमा तापलेल्या खडकाच्या आहेत का, याचा शोध पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















