खेड : आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

प्रसाद मारोतराव गुरनुले (५४, नवी मुंबई) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते सानपाडा येथे जाण्यासाठी नवलाई ट्रॅव्हलसच्या बसमधून (एम.एच. ०८/ए.पी. ९४७६) प्रवास करत होते.

बस कशेडी घाट चढत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

बसमधील प्रवाशांनी उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यानुसार येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *