Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

चिपळूण : कामथे घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुण जागीच ठार

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमधील कामथे घाटात क्रेनचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी याच घाटात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे.


ओंकार राजेश पाकळे (२७, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा आपल्या ताब्यातील यामहा कंपनीची आरवन 5 ही दुचाकी घेऊन रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कामथे घाटातून वेगाने चालला होता.

मात्र, वांगी पुलाजवळ एका अवघड वळणावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि अत्यंत वेगात असणारी बाईक महामार्गवरील लोखंडी रेलिंगला धडकली.

ही धडक एवढी जोरात होती की ओंकारच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यातून खूप रक्तस्राव झाला. अपघात झालेला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.

त्यातील काहींनी ओंकारला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *