Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : बेकायदा वाळू प्रकरणी दोन ठिकाणी कारवाई

banner 468x60

चिपळूण शहरात शासकीय दराने वाळू उत्खनन आणि वितरण सुरू असताना दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी कालुस्ते बुद्रुक व गोवळकोट येथे महसूल विभागाने धडक कारवाई केली.

यामध्ये तीन डंपर व साडेचार ब्रास वाळू जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
दाभोळ खाडीत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाळू उपसा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

करंबवणेसह खेड हद्दीतील बहिरवली परिसरात सक्शन पंपाने उच्छाद मांडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शासकीय वाळूचे दर वाढल्यानंतर ग्राहकांनी ही वाळू खरेदी करण्याकडे पाठ फिरवत अनधिकृतपणे उपसा होणाऱ्या वाळूकडे मोर्चा वळवला आहे.

शासकीय वाळूतील होत नसलेली विक्री आणि वरिष्ठ स्तरावरून करण्यात आलेली विचारणा, यानंतर शुक्रवारी (ता. १) महसूल आणि जिल्हा खनिकर्म या दोन्ही विभागांची पथके खाडीमध्ये कारवाईसाठी उतरली. या वेळी काही सक्शन पंपही आढळले, मात्र ते बंद होते. तर तीन डंपर अनधिकृत वाळू वाहतूक करताना आढळून आले.

ते जप्त करण्यात आले आहेत. हे डंपर कालुस्ते येथील अन्वर शरफुद्दीन जबले आणि गोवळकोट येथील आरिफ हजवानी यांच्या मालकीचे आहेत. दरम्यान, ही कारवाई आणि त्याबाबतची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे कारवाईचा संपूर्ण तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र झालेल्या कारवाईला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *