Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : आकांक्षा कदम नऊ वेळा राज्यस्तरीय कॅरमची विजेती

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने आतापर्यंत तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकावले आहे.

मुंबई येथे झालेल्या १५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेची ती दुसऱ्यांदा विजेती ठरली आहे. मुंबई शिवाजी पार्क जिमखाना व महाराष्ट्र कँरम असोसियशन यांनी आयोजित केलेल्या १५ व्या राज्य मानांकन कँरम स्पर्धेत आकांक्षा कदम सहभागी झाली होती.

तिने चैताली सुवारे,काजलकुमारी यांना पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीत आकांक्षाने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकरवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात १६-०८-१३, २४-०८-०९, २५-०७-०१ असे नमवून नवव्यांदा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद पटकविले.

तिने २०२२ मध्येही शिवाजी पार्क जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिचे हे दुसरे विजेतेपद आहे. आकांक्षा ही अवघी अठरा वर्षाची असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *