मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दापोलीतील नॅशनल हायस्कूलने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले.

दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी आयएसओ मानांकन मिळवणारी शाळा ठरली आहे. नॅशनल हायस्कूलची स्थापना १९४० मध्ये मुनीर खान सर्गुरोह यांनी केली होती. संस्थेचे ज्युनिअर कॉलेज व महिला महाविद्यालय कार्यरत आहे. पाचवीपासून डिग्री कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांची एकूण संख्या ९५० एवढी आहे.
प्रशालेत शिकणाऱ्या बहुतेक मुलांचे पालक मध्यमवर्गीय आहेत. सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अगोदर श्रमदान आणि मग उरलेल्या कामासाठी निधीसंकलन हे सूत्र ठरवून शाळेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.
शाळेची सुशोभित स्वातंत्र्यपूर्व काळातील इमारत, सेमी इंग्रजी माध्यम, बोलक्या भिंती, ई लर्निंग सुविधा, वर्गामध्ये व्हाईट बोर्ड, पाणी पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर, सुसज्य ग्रंथालय, अटल टिकरिंग लॅब, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक लॅब, प्रशस्त मैदान, शाळेसमोर विविध फुल फळांची झाडे, शालेय पोषण आहाराची प्रभावी अंमलबजावणी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वस्तू व कपड्यांच्या स्वरूपात मदत अशा विविध वैशिष्ट्यांसह दर्जेदार शिक्षणामुळे पट संख्येचा आलेख दरवर्षी वाढत आहे.
मुख्याध्यापक आयुब मुल्ला यांच्या अथक प्रयत्नांमुळे शाळा व कॉलेजचा कायापालट झाला आहे. सर्व निकषांची पूर्तता आहे हे पाहून आयएसओकडून प्रशालेला लक्ष्मीकांत साधू यांच्या हस्ते प्रमाणपत्र हस्तांतर करण्यात आले.
या हस्तांतर कार्यक्रमाच्या प्रसंगी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे चेअरमन आरिफ मेमन ,नगराध्यक्ष खालीद रखांगे आदी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















