दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज (६ फेब्रुवारी ) तहसीलदार प्रागंणात उपोषण केलंय. दाभोळ ग्रामपंचायत आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांनी कुठे बसावं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हा वाद आता उपोषणापर्यंत जाऊन पोहचला आहे.
याआधी दाभोळ ग्रामपंचायत सदस्यांनी २६ जानेवारीला उपोषण केलं असून यानंतर आता दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज उपोषण केलं आहे. मुलींचं होणारं नुकसान, मुलींची होणारी हेळसांड याला सर्वस्वी जबाबदार दाभोळ ग्रामपंचायत असेल असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे.

आमची दाभोळ शाळेत पर्यायी व्यवस्था केली तर या शाळेची डागडुजी कधी होणार जरी ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल तरी जी वर्क ऑर्डर निघाली आहे ती खोटी आहे का असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शाळेचं काम का करू देत नाही यामध्ये आर्थिक गणित असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आम्ह्यला हीच शाळा हवी आहे, जर आमच्या मुली शिकल्या नाही तर याची जबाबदारी दाभोळ ग्रामपंचायतची असेल असं दाभोळमधील पालकांचं आहे.
स्वतःचा विकास आणि आर्थिक गणित असल्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतला शाळा नको आहे असं या पालकांचं म्हणणं आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं आहे.
दाभोळ कन्या शाळा प्रकरणाची चौकशी करून योग्य निर्णय देण्याचं आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिलं आहे. जिल्हा परिषद बांधकाम चिपळूण या प्रकरणी कार्यकारी अभियंता ९ फेब्रुवारीला दाभोळला येऊन योग्य निर्णय देण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यानंतरही आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा उपोषणकर्त्यानी दिला आहे.
दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज उपोषण केलं
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
दाभोळ कन्या शाळा प्रकरणाची चौकशी करून योग्य निर्णय देण्याचं आश्वासन
जिल्हा परिषद बांधकाम चिपळूण या प्रकरणी कार्यकारी अभियंता दाभोळला येणार
९ फेब्रुवारीला दाभोळला येऊन योग्य निर्णय देण्याचं आश्वासन

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















