सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूर आणि कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) च्या संयुक्त विद्यमाने राजापूरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
शिबीरात विविध प्रकारच्या ४५० रूग्णांनी लाभ घेतला.शहरातील बक्करशेठ उर्दू शाळा इमारतीत रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर पार पडले. कुराण तिलावते पठणाने या शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सुन्नी दावते ईस्लामीचे प्रमुख रिजवान खान यांनी या शिबीराचा हेतु स्पष्ट करून कोकणातील सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी आंम्ही हा प्रयत्न केल्याचे नमुद केले.
तर यावेळी त्यांनी या शिबीरासाठी मुंबईतुन आलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांचा परिचय करून देत या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या शिबीरात कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) चे अनेक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
त्यामध्ये स्त्री रोग तज्ञ, हाडांचे, डोळयांचे, त्वचा रोग तज्ञ, मधूमेह, ह्दय रोग, फीजोथिअरपी तज्ञ यांचा समावेश होता. सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूर आणि कोकणी डॉक्टर्स असोसिएशन (KDA) यांच्या वतीने करण्यात आलेल्या या शिबीराच्या यशस्वीततेसाठी सुन्नी दावते ईस्लामी शाखा राजापूरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















