Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Dapoli दापोली : सावधान! आक्षेपार्ह पोस्ट न करण्याचं रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांचं दापोलीकरांना आवाहन, पोलिसांची सोशल मीडियावर नजर

banner 468x60

राज्यातील विविध शहरात सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस Police अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर (Sociala Media) प्रसारित करु नये, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.

रत्नागिरीतील दापोलीत हिंदूंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टनंतर दापोलीत तणाव निर्माण झाला. पोस्ट करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

त्याचबरोबर पोलिसांकडून दापोलीकरांना खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.

सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये.

तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *