दाभोळ : राजस मुरकर
वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाने लोकमान्य टिळक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी दाभोळ ग्रामपंचायतच्या सरपंच राखी तोडणकर यांनी प्रथम क्रीडा ज्योत पेटवून व श्रीफळ वाढवून शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले त्यानंतर डॉक्टर ऋषिकेश केतकर यांनी हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
लगेचच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर वैभव दळी यांचे हस्ते करण्यात आले. सलग दोन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेतील जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती दर्शविली.
क्रीडा स्पर्धांच्या अंतिम सत्रात उपस्थितांना रंगतदार सामन्याची अनुभूती मिळाली. यावेळी क्रीडा स्पर्धां मधील अष्टपैलू खेळाडू म्हणून लहान गटातून यतिका वाडकर, प्रथमेश थोरे व मोठ्या गटातून पायल शिगवण, सार्थक दाभोळकर ह्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. यावेळी दाभोळ शहरातील अक्षय नेटवर्कचे संचालक दादू मुरमुरे यांनी गावामध्ये संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण केले. यावेळी उपस्थितांनी शाळेसाठी भरभरून देणगी दिली. लाईव्ह कार्यक्रम पाहणाऱ्या मुंबईकरांकडूनही यावेळी बक्षीस/ देणगी प्राप्त झाली.
दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मेघश्याम शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या “अभिव्यक्ती” या हस्तलिखिताचे प्रकाशन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
यावेळी शाळेमधील पाचवी ते दहावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शालांत परीक्षेत दाभोळ केंद्रामधून प्रथम येणाऱ्या सेजल रामाणे (91. 40%), लो. टि. विद्यालय, चिखलगाव हिचाही गौरव करण्यात आला. सार्थक उसगावकर याने बनविलेली दाभोळ फेरीबोटीची प्रतिकृती तसेच दहावीच्या विद्यार्थिनींनी बनविलेली चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती उपस्थितांच्या नजरेत भरली.
जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारस राजवाडकरचे विशेष कौतुक करण्यात आले.
पारितोषिक वितरणासाठी व्यासपीठावर दाभोळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभय गोयथळे, सचिव ॲड. प्रशांत शहा, सौ.सुषमा रेडीज, राजेंद्र मयेकर, प्रमुख पाहुणे मेघश्याम शेलार, ग्रामपंचायत दाभोळच्या सरपंच राखी तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य उदय जावकर दाभोळ भंडारी समाजाचे पदाधिकारी दिलीप तोडणकर, गिरीश वानरकर, प्रेमानंद महाकाळ, नंदकुमार मयेकर, द्वारकानाथ भाटकर, गजानन तोडणकर तसेच महेश्र्वर खोत, गणेश नरवणकर, सुदेश कुलाबकर, तेजल मुरकर, नरबेकर, दत्तप्रसाद मोरे, विठ्ठलदास मोरे, सुजित वानरकर, रुपेश नरबेकर, मयेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पि. एम. वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निमकर जि. व्ही., कासेकर एस. आर.,बागुल ए. आर, राजेश गावित, मनिषा बारे, श्रेया उसगावकर, आदित्य मोरे, प्रितम जाधव, सुविधा लिंगावले, सुमन गांगुर्डे यांनी अल्पावधीत आणि अपुरा स्टाफ असतांनाही नीटनेटके केले.
शेवटी वंदेमातरम गीताने आणि स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















