Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : आडे खाडीत बेकायदेशीर वाळू उपसा, वाळू उपशावर महसूल विभाग गप्प का ?

banner 468x60

दापोली तालुक्यातील आडे खाडीत मागील दोन महिन्यांपासून बेकायदेशीर सक्शन पंप लावून भरमसाट वाळू उपसा केला जात आहे. याबाबत दापोली महसूल विभागाला माहिती देऊनही कारवाई करण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे फावले आहे.

या वाळू उपशाने आडे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा वाळू माफियांना बळ देतंय कोण? असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

खाडीकिनारी असणारी वाळू यातील चार घमेल वाळू एखाद्या नागरिकाने नेली तर लगेच महसूल अधिकारी कारवाईचा बडगा उगारतात मग आडे येथे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी पाठराखण का? असा सवाल देखील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

मागील दोन महिन्यात आडे येथे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी करोडो रुपयांचा महसूल बुडवून कित्येक ब्रास वाळू विक्री केली आहे. भर रहदारीच्या मार्गावर सुरू असलेला हा वाळू उपशाचा गोरखधंदा महसूल अधिकारी आणि यंत्रणा बघत असून देखील कारवाई करण्यास धजत नाहीत.

त्यामुळे याबाबत आता नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वाळू उपशाने सावित्री पूल दुर्घटना झाली, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. ही घटना जुनी असली तरी त्या घटनेची आठवण आजही होते. असे असताना दापोली महसूल विभाग मात्र याबाबत मूग गिळून गप्प असल्याचे दिसत आहे.

आडे येथील वाळू उपशावर कारवाई करू, बघू, माहिती घेतो, अशी उत्तरे मात्र महसूल अधिकारी यांचेकडून नागरिकांना मिळत आहेत. याबाबत आता खनिकर्म अधिकारी यांनी लक्ष घालून या वाळू उपशावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *