दापोली : रोवले येथे अपघात, दुचाकी चालकावर गुन्हा

banner 468x60

रोवले येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या दुचाकी व डंपर अपघातात तिघेजण जखमी झाले. पांडुरंग महाडिक, दिनेश बालगुडे व महेश बालगुडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

वरील तिघेजण दुचाकीवर तिघेजण बसून आंबवली ते डौली असा प्रवास करीत होते. सदर मोटारसायकल महेश बालगुडे चालवत होते.

ते रोवले शेवाळे फाटा येथे आले असता त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोरून येणाऱ्या दहा चाकी मायनिंगच्या डंपरला धडक दिली.

यामध्ये मोटार सायकलवरील तिघेही जखमी झाले. याप्रकरणी महेश बालगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *