खेड : पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

banner 468x60

खेड तालुक्यातील पाणीटंचाई कृती आराखड्या बाबतची सभा आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये खेड तालुक्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कशी मात करायची याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

banner 728x90 banner 728x90


खेड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूला -सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगराळ भाग आहे, तर खालील बाजूला अरबी समुद्राला जोडून असलेली खाडी आहे. त्यामुळे कोकणात कितीही पाऊस झाला तरी ते पाणी समुद्रालाच जाऊन मिळते.

याचा परिणाम म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या महिना अखेरीस डोंगराळ भागातील गावांना व वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून अशा सर्व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो.


पाणीटंचाईची सोडविण्यासाठी गावांचे सरपंच ग्रामस्थ, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकी दरम्यान उपस्थित सर्वांशी संवाद साधण्यात आला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे योग्य आहे, यासंबंधित उपस्थितांनी मांडलेली मते जाणून घेण्यात आली.

तसेच जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी अपूर्ण असलेले ग्रामपंचायतींचे प्रस्ताव, बक्षीस पत्र व संमतीपत्र या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यास ग्रामसेवक व सरपंच यांना आ. कदम यांनी आदेश दिले.


यासोबतच एप्रिल महिन्याअखेर नळपाणी योजनेची रखडलेली सगळी कामे पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनादेखील आदेश दिले. खेड तालुका हा पाणी टंचाईमुक्त करण्या साठी प्रयत्न सुरू राहतील, असे आ. कदम म्हणाले..


याप्रसंगी तालुक्याच्या प्रांत राजश्री मोरे, तहसीलदार सुधीर सोनवणे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आण्णा कदम, शंकर कांगणे, चंद्रकांत चाळके, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, माजी पं. स. सभापती रामचंद्र आईणकर, तसेच विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, उपसरपंच, सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *