दापोली : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्मिती, संशोधनविषयक जिज्ञासूवृत्ती वाढविणार्या विद्यार्थ्यामधून भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी निवडक प्रज्ञावान विद्याथ्यांना NASA अमेरीका ISRO, भारतd या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थाना भेट घडवून आणणे ही एक महत्वाकाक्षी योजना राबविण्यात येत असून सदर योजना ही फक्त जिल्हा परिषद
रत्नागिरी अंतर्गत जि.प.शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यापुरतीच मर्यादीत असते,यासाठी विविध पातळींवर चाळणी परीक्षा नुकत्याच घेऊन दापोली तालुक्यातील जि.प.शाळा मळे येथील सख्खे बहिण -भाऊ
मानिनी मंगेश आग्रे आणि मंथन मंगेश आग्रे यांचेसह कुडावळे नंबर १ शाळेतील सर्वोत्तम गूण मिळवणारी अंशुल पाटील आरोही मुलुख-चंद्रनगर,
जान्हवी तांबुटकर – विरसई अशा पाच विद्यार्थ्यांची इस्त्रो दौर्यासाठी निवड झाली असून,आज इस्त्रो अभ्यास दौर्यासाठी सदर भावी शास्त्रज्ञांना रत्नागिरी येथे पाठवणेत आले,उद्या सकाळी रत्नागिरीतून प्रत्यक्ष सर्व विद्यार्थी रवाना होणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही उच्चभ्रू कुटुंबातील नसून,सर्वसाधारण कुटूंबातील विद्यार्थ्यांनां अशा अभ्यास दौर्यासाठी संधी देणारी रत्नागिरी ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.
तसेच व्हिजन दापोलीच्या सरावामुळे तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावतांना दिसत असल्याचेही ते म्हणाले.
नोडल आॅफीसर संजय दरेकर, बळीराम राठोड, तसेच विस्तार अधिकारी संजय दरेकर,पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे,तसेच सर्व केंद्रप्रमुख यांची प्रेरणा मिळाल्याचे सर्व विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.
आणि जिल्हा परिषदेने आपणास संधी दिल्याबद्दल अभार व्यक्त केले.यावेळी गटविकास अधिकारी सुनिल खरात आणि बळवंतराव यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवड झालेल्या शाळांचे शिक्षकही उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















