दापोलीत पारा 11.9 अंश सेल्सिअसवर

banner 468x60

मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला होता. त्यामुळे दापोलीकर गारठले आहेत.

banner 728x90 banner 728x90

यंदाच्या हंगामातील ही निचांकी नोंद आहे. कोकण कृषी विद्यापिठाच्या हवामान केंद्रावर ही नोंद झाली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीसाठी दाखल झालेल्या पर्यटकांसाठी ही पर्वणी आहे.

आठवड्यात थंडी आणि ढगाळ वातावरण असे संमिश्र वातावरण कोकणात अनुभवायला मिळत होते. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

हवामान विभागाकडून राज्यभरात थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी (ता. २६) जिल्ह्यात सगळीकडेच थंडीचा प्रभाव जाणवला. सर्वाधिक थंडी दापोली तालुक्यात जाणवली. पहाटेपासून ठिकठिकाणी धुक्याची दुलई पांघरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कोकण कृषी विद्यापिठाकडून दापोलीत मंगळवारी किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस नोंदल्याचे जाहीर केले.

पुढील आठवड्यात पारा आणखी खाली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. याच वेळी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास हवेत गारवा होता. थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. या विषयी ज्येष्ठ आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे म्हणाले, पुढील आठवडाभर थंडीचा जोर कायम राहणे आवश्यक आहे. पारा १९ अंशाखाली आला तर मोहोराची फूट वेगाने होईल आणि कणी दिसू लागेल. त्यापासून मिळणारे उत्पादन हे बागायतदारांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *