राजापूर : संगणक प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणीचा विनयभंग

banner 468x60

शहरात संगणक प्रशिक्षणासाठी येणाऱ्या युवतीची छेडछाड काढणाऱ्या राजापूर मधीलवाडा येथील जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलिसांनी भादंवि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


तर जयान सोलकर याला मारहाण केल्याप्रकरणी डोंगर येथील सउद सजन मस्तान व रिजवान हयात खान या दोघांवर कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील डोंगर येथून संगणक प्रशिक्षणासाठी राजापूर शहरात येणाऱ्या एका तरूणीला राजापूर मधीलवाडा येथे राहणारा जयान सोलकर हा सातत्याने त्रास देत होता.

या बाबत पीडित तरूणीने सोमवारी सांयकाळी उशिरा राजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. जयान याने राजापूर शहरातील बाजारपेठेत आपणास अडवून विनयभंग केल्याचे पीडित तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

तिच्या तक्रारीवरुन जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलीसानी भा.द.वि. कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या रागातून जयान सोलकर याला डोंगर येथील सउद सज्जाद मस्तान व रिजवान हयात खान या दोघांनी शनिवार सायंकाळी बेदम मारहाण केली.

अशी फिर्याद जयान सोलकर याने राजापूर पोलीस स्थानकात दिली. वरील दोघांनी आपल्याला दुचाकीवर बसवून विलये रोडवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे नेवून माझे हात बांधून लोखंडी रॉडने व काठीने जबरी मारहाण व शिवीगाळ केल्याचे सोलकर याने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी राजापूर पोलिसानी सउद मस्तान व रिजवान खान या दोघांवर मारहाण केल्याप्रकरणी भादंवि कलम 324, 34, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *