Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

संगमेश्वर : आकांक्षा कदमची ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी

banner 468x60

रत्नागिरी : आंध्र प्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेत देवडे (ता. संगमेश्वर) गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा उदय कदम हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

आंध्र प्रदेश राज्य कॅरम असोसिएशन यांच्या विद्यमाने गितम केआरएम इंदोर स्टेडियम विशाखापट्टणम येथे २८ व्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम ही इंडियन ऑईल व ओएनजीसी कंपनीच्या संघातून सहभागी झाली होती. या स्पर्धेत आकांक्षाने उत्तुंग अशी कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत २७ राज्य व १० कंपन्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १८ वर्षीय आकांक्षाने चमकदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली आहेत. आकांक्षाने आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आयेशा खान, एस अपूर्वा, रश्मीकुमारी यांना पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

आंतरराष्ट्रीय कॅरमपटू एस. अपूर्वा बरोबर खेळताना तिने ब्रेक टू फिनिशची नोंद केली; परंतु सेमीफायनलला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू नागाज्योतीकडून आकांक्षाला थोडक्यात हार पत्करावी लागली.


आकांक्षाने राज्य पातळीवर तीन वेळा ज्युनिअरचे तर आठवेळा खुल्या गटाचे विजेतेपदक पटकावले आहे. तर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ज्युनिअर गटात आकांक्षाने एक वेळेस विजेतेपद तर एक ब्रांझ पदक मिळविले आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक व दोन ब्रांझपदके मिळविली आहेत.

जिल्हास्तरीय, विभागीय स्पर्धेतही आकांक्षाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी आकांक्षाने पश्चिम बंगाल दुर्गापूर येथे झालेल्या इन्स्टिट्यूटच्या नॅशनल कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून विजेतेपद पटकावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *