चिपळुण : सरपंच, ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

banner 468x60

विविध मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशीही तालुक्यातील १३० ग्रामपंचायती बंद राहिल्या. तालुक्यातील सरपंचांनी संघटित होत पंचायत समितीसमोर धरणे धरले.

पंचायत समिती प्रशासनाला निवेदन देत यापुढेही विविध मागण्यांसाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. ग्रा. पं. चा कारभार यामुळे ठप्प झाला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कर्मचारी व संगणक परिचालक यांनी १८ ते २० डिसेंबर दरम्यान संप सुरू केला आहे.

banner 728x90 banner 728x90

संपाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने संपात उतरले. पंचायत समिती समोरील दत्त मंदिराच्या प्रांगणात सरपंचांची बैठक झाली. याबैठकीत सरपंच सुनील सावंत, श्रेया वीरकर, पाडुरंग माळी, आणि योगेश शिर्के तर ग्रामसेवकांच्या वतीने संघटनेचे सचिव रोहिदास हांगे आदींनी ग्रामपंचायतीच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

त्याबाबत शासनस्तरावर योग्य निर्णय होण्यासाठी हा लढा सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व संगणक परिचालकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

माजी सभापती शौकत मुकादम यांनीही संपकऱ्यांना भेट देत मार्गदर्शन केले. बुधवारी देखील संप सुरू राहणार असून गुरुवारी नियमितपणे ग्रामपंचायतींचा कारभार सुरू राहणार आहे. सहायक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *