Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

ए.एस्.जी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी) लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण, फ्लाईट एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि ए. एस. जी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी

banner 728x90

यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी ए.एस्.जी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शृंगारतळी येथे करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला.

शिबिराच्या सुरुवातीस ए.एस्.जी इन्स्टिट्यूटचे संचालक जहूर बोट यांनी शृंगारतळीतील प्रतिष्ठित समाजसेवक गुलामभाई तांडेल यांच्याहस्ते लाईफकेअर हॉस्पिटल चिपळूण च्या सर्व डॉक्टर्स व त्यांचे सहकार्‍यांचे स्वागत केले. या शिबिराला अस्थिरोग व सांधेरोपण तज्ञ, नामवंत डॉक्टर हुजैफा इसहाक खतीब हे उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना या मोफत शिबिराचा लाभ मिळाला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ए.एस्.जी इन्स्टिट्यूट व लाईफ केअर हॉस्पिटल च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. गोरगरीब रुग्णांनी मिळालेल्या या सेवेबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *