चिपळूण : धक्कादायक!दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

banner 468x60

चिपळूणमधील कोकरे गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बलात्कार करून निर्जन ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी आढळली आहे.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी 2 नराधमाना अटक केलीय. कोकरे गावातील धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संतापजनक प्रकारानंतर कोकरे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोस्को आणि 376 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *