Breaking News
मंडणगडचा पाणीप्रश्न आता इतिहासजमा होणार! 41 कोटी 69 लाखांच्या नळपाणी योजनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून योगेश कदमांचे कौतुक; नागरिकांना दिवाळीची मोठी भेट दापोली : भाजपला धक्का! युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विराज खोत यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, पक्षातील अपमानास्पद वागणुकीचा आरोप करत दिला होता राजीनामा राजापुरात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा 26 वर्षीय तरुण जेरबंद, 83 हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख : आंबव येथील अपघातातील गंभीर जखमी केतन मोहिते यांची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान निधन चिपळूण : दोन दुचाकींची समोरासमोर 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली : समुद्रात पोहायला गेलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील कर्दे येथील समुद्रकिनार्‍यावर पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४:३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

दशरथ जगदीश यादव (४०, रा. घोरपडे पेठ, वेगा सेंटर समोर, शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे) असे त्यांचे नाव आहे. समुद्रस्नान करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती किरण कैलास निवंगुने (रा. पुणे) यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली आहे. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमधील दशरथ यादव हे बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले.

ही घटना कळताच स्थानिकांनीही त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुणे परिसरातील एकूण चार मित्र पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. या घटनेत मृत्यू झालेले दशरथ यादव हे अविवाहित असून, पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक दापोलीत दाखल झाल्यावर विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *