दापोली : क्षुल्लक कारणावरून पोस्ट ऑफिस गल्लीसमोर एकावर कोयत्याने वार, प्रवीण शेठची दादागीरी

banner 468x60

दापोली शहरातील पोस्ट ऑफिस गल्लीसमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकावर कोयत्याने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी (दि. ६ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृषाली कदम (३८, व्यवसाय भाजी विक्री, रा. काळकाई कोंड नागरबुडी) व तिचा पती राकेश कदम हे दोघे दवाखान्यात जात होते. तेव्हा त्यांच्या दुकानाची लोखंडी मांडणी प्रदीप शेठ यांच्या सांगण्यावरून त्याच्या कामगाराने उचलून बाजूला ठेवली होती.

याबाबत वृषाली कदम या शेठला विचारणा करण्याकरिता गेल्या. त्यावेळी प्रवीण शेठ याने वृषाली कदम व तिचा पती राकेश कदम यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळेला झालेल्या भांडणात राकेश कदम हा वृषाली कदम हिला वाचवण्याकरिता पुढे आला. तेव्हा प्रवीण शेठ हा त्याच्या अंगावर धावत गेला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत हातातील कोयतीने राकेश कदम याला दुखापत झाली.

दापोली पोलिस ठाण्यात प्रवीण शेठ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *