Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : रिसॉर्ट प्रकरण – सदानंद कदमांच्या अडचणी वाढणार, हायकोर्टाने पुन्हा जामीन फेटाळला

banner 468x60

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात शिवसेनेचे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांचा जामीन अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळला.

न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने कदम यांना दिलासा देण्यास नकार दिला. रत्नागिरी येथील दापोलीमध्ये उभारण्यात आलेल्या साई रिसॉर्टशी संबंधित झालेल्या पैशाच्या अफरातफरीबाबत ईडी चौकशी करत असताना त्यात कदम यांचे नाव पुढे आले.

मार्च मध्ये ईडीने कदम यांना अटक केली.
अनिल परब यांना रत्नागिरीत जागा घ्यायची होती आणि त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला. ऑक्टोबरमध्ये विशेष पीएमएलए न्यायालयाने कदम यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *