Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : कुडावळे देवखोलवाडीत बिबट्याची दहशत

banner 468x60

दापोली तालुक्यातील कुडावळे देवखोलवाडीत बिबट्याची दहशत वाढली असून दिवसाढवळ्या बिबट्याचा संचार वाढला आहे. गेल्या १५ दिवसांत २ गायींसह २ बोकड आणि एका बकरीला ठार मारून बिबट्याने फडशा पाडला असल्यामुळे येथील रहिवाशांना आपल्या घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे. दापोली

तालूक्यातील कुडावळे देवखोल वाडीत भर दिवसा बिबट्याचा संचार वाढला असून या बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्याकडे वळविला आहे.

याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला देऊनसुद्धा वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पिंजरा लावून पिंज-यात पकडण्याऐवजी केवळ बघ्याचीच भूमिका घेत आहेत.

कुडावळे येथील देवखोलवाडीत राहणाऱ्या सुरेश भुवड यांच्या एका जर्सी गायीला, नितिन करंजकर यांच्या एका बक-याला, महेंद्र पांढरे यांच्या एका बक-याला आणि एका बकरीला तर प्रताप पांढरे यांच्या गायीला बिबट्याने ठार मारले.

या सर्व घटना मागील पंधरा दिवसापासून घडत आहेत. ज्यांच्या पाळीव प्राण्यांना मारले ते सर्व गरीब शेतकरी आहेत. बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे देवखोल वाडीतील लोक भीतीच्या छायेखाली वावरत असून त्यांना दिवसाही घराबाहेर पडण्यास भीती वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *