Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

खेड : तरुणीची छेड काढणाऱ्या ट्रक चालकाच्या खेड पोलिसांनी दीड तासात आवळल्या मुसक्या

banner 468x60

दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावात कॉलेजवरून घरी जाणा-या तरुणीची छेडछाड करणाऱ्या ट्रक चालकाच्या मंगळवारी रात्री अखेर खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

तरुणीची छेड काढून जंगलात पळत असताना दारूच्या नशेत पडून गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *