आंजर्ले : खाडी पुलावरील मोकाट गुरांचा वावर वाहतुकीस ठरतोय अडथळा

banner 468x60

दापोली हर्णे आंजर्ले सुकोंडी केळशी हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे या मार्गावर एस.टी.बसेसशिवाय खाजगी वाहनांची कायमच वर्दळ सुरू असते अशा या मार्गावर आंजर्ले खाडी पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा वाहतुकीस मोठाच अडथळा ठरत आहे.

दापोली तालुक्यातील दापोली हर्णे आंजर्ले सुकोंडीहून पुढे आडे केळशी मांदिवली या गावांकडे जाणारा एक अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे.

banner 728x90

या मार्गावर हर्णे येथील समुद्राच्या पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, आंजर्लेतील सुप्रसिध्द कडयावरचा गणपती, केळशी येथील श्री महालक्ष्मी देवस्थान त्याचप्रमाणे उटंबर डायरा येथील याकुबबाबा सरवरी दर्गा या पर्यटन स्थळांसह हर्णे येथील

जिल्हयातील दुस-या क्रमांकाचे असलेले मच्छिमारी बंदर तसेच केळशी आणि हर्णे येथील व्यापारीपेठांमध्ये आंजर्ले केळशी सुकोंडी पाजपंढरी परीसरातील गावांमधील रहीवाशांची या ना त्या खरेदीच्या निमित्ताने तर पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटकांची वाहने सतत या मार्गावर ये जा करत असतात असा हा मार्ग आता सुस्थितीत असला तरी आंजर्ले खाडीपुलावर रात्रंदिन ठाण मांडून बैसलेल्या उनाड गुरांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

आंजर्ले खाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी अलिकडेच शासनाने तीन सव्वातीन कोटी रूपये खर्च केले आहेत.अशा या पुलावरून जाताना गुरांच्या मलमुत्राच्या वासाचा होणारा त्रास एकवेळ ठिक आहे पण हीच गुरे एखाद वेळेस अचानकपणे अशी उधळतात की बेसावध असलेल्यांनाच नव्हे तर सावधपणे मार्गक्रम करणा-यांचेही येथे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोकाट गुरांचा प्रसाद मिळाल्याने तिघांना तर त्याची चांगलीच किंमत चुकवावी लागली आहे आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील या पुलावरील वाहतूक विना अपघात व सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी काय उपाय योजना करता येईल हे पाहायला हवे म्हणजेच अपघात विरहीत त्याचप्रमाणे सर्वांचाच या मार्गावरून सुखाचा प्रवास होण्यास मदत होईल त्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *