गुरुवारी खेडचे आगारप्रमुख नंदकुमार जाधव व आगार व्यवस्थापक श्री. पवार यांची खेड एसटी आगार येथे भेट घेऊन प्रशासनाने अचानक भाडेवाढ केली तर खेड तालुक्यातील वारकरी संप्रदाय ग्रामस्थांना कार्तिक वारीकरिता मागणीप्रमाणे पंढरपुर येथे जाण्यासाठी पुरेपूर गाड्या सोडाव्यात, या मागणीसाठी खेड, दापोली व मंडणगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी निवेदन सादर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एस.टी.आगारातुन १० टक्के भाडेवाढ केली आहे. ही वाढ गोरगरीब जनतेला परवडणारी नाही. एकीकडे अवकाळी पावसाने कोकणात शेतीची नुकसानी केलेले असून, त्यातच १० टक्के एसटीची भाडे वाढ ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही.
एसटी प्रशासनाने केलेली भाडेवाढ प्रवासी जनतेची व पंढरपुर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची क्रृरचेष्टा प्रशासनाने केली आहे. ही नव्याने केलेली भाडेवाढ रद्द करावी. तसेच पंढरपूर वारीकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे बससेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी माजी आमदार संजय कदम यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे, मुरडे सरपंच मनोहरz शिबे, जेष्ठ शिवसैनिक विष्णु कदम, बोरघर सरपंच सौ. धारा बोरकर, किरण बोरकर, मंदार शिर्के इतर सर्व वारकरी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















