गुहागर : वेलदूरच्या साहिल दाभोळकरला सुवर्णपदक

banner 468x60

तालुक्यातील वेलदूर-सिद्धेश्वरनगर येथील साहिल विठोबा दाभोळकर याला इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्टकॅम्पसच्या पदवीत सुवर्णपदक पटकावले.

ही पदवी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याला प्रदान करण्यात आली. साहिल दाभोळकर याने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग, इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्ट कॅम्पसमध्ये केले.

banner 728x90

या कॅम्पसमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळाले. इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी चेन्नई ( बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय विद्यापीठ, भारत सरकार) येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्णपदक व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

साहिल दाभोलकर म्हणाले, मला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि पदवी प्रदान करण्यात आली हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. कठोर परिश्रमामुळेच हे यश मिळवता आले. माझ्या आई बाबांचा, कुटुंबीयांच्या पाठिंब्यावर हे यश मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *