दापोली : कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत

banner 468x60

शासनाच्या आदेशानुसार राज्यात ‘कुणबी-मराठा’ जातीच्या नोंदीची शोध मोहीम सुरू आहे. दापोली तालुक्यात ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख असलेल्या दोन नोंदी सापडल्या असून, काेकणातील या पहिल्याच नोंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दापाेलीतील कांगवाई व पाेफळवणे गावातील ग्रामस्थांच्या मृत्यूबाबत केलेल्या या नाेंदीमध्ये ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख सापडला आहे.

banner 728x90

मराठा समाजाला ‘कुणबी-मराठा’ असे जात प्रमाणपत्र देऊन त्यांना तसे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी बेमुदत उपाेषणाचा मार्गही अवलंबला हाेता.

त्यानंतर शासन दप्तरी असणाऱ्या नाेंदी तपासून ‘कुणबी-मराठा’ नाेंदीचा शाेध घेण्यात येत आहे. त्यासाठी शासन दप्तरी असणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नाेंदी तपासण्यात येत आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी नोंदी तपासण्याच्या कामात व्यस्त आहेत. काेकणात माेठ्या प्रमाणात मराठा समाज आहे.

मात्र, हा समाज ‘कुणबी-मराठा’ नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मराठा समाजाने ‘कुणबी-मराठा’ असे प्रमाणपत्र घेण्यास विराेधही दर्शविला आहे. मात्र, दापाेली तालुक्यात ‘मराठा-कुणबी‘ अशी नाेंद असलेले पुरावेच सापडले आहेत. दापाेलीतील तहसील कार्यालयात अस्तित्वात असलेल्या महसुली दप्तरी ‘मराठा-कुणबी’ अशा नाेंदी आढळल्या आहेत

. तालुक्यातील कांगवाई गावातील गंगाराम सखाराम घाग यांच्या मृत्यूची नाेंद १२ डिसेंबर १९६५ राेजी करण्यात आली असून, त्यातही ‘मराठा – कुणबी’ असा उल्लेखआहे. तसेच पाेफळवणे गावातील दाैलत धाेंडू माेरे यांच्या मृत्यूबाबत २४ डिसेंबर १९६७ राेजी नाेंद करण्यात आली आहे.

त्यांच्या नावासमाेर ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या दाेन्ही नाेंदी काेकणात आढळलेल्या पहिल्याच नाेंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *