खेड : आवाशी येथे कंपनीच्या गाडीखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

banner 468x60

बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे लवेल येथील प्रौढ मृत झाल्याची घटना खेड तालुक्यातील आवाशी – गुणडे फाटा येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लवेल धाडवेवाडी येथील तरुण युवराज धाडवे (४०) मोटारसायकलने आवाशी येथील नेरोलॅक कंपनीतून जनरल शिफ्ट संपवून घरी चालला होता.

banner 728x90

आवाशी गुणदे फाटा येथे रस्ता ओलांडण्यासाठी तो थांबला असताना येथीलच यु. एस. व्हिटॅमिन कंपनीची जनरल शिफ्ट संपलेल्या कामगारांना घेऊन जाणारी बस त्याच्यामागून येऊन त्याच्यावर जोरदार धडकल्याने युवराज दुचाकीसह बसखाली अडकला. त्यात त्याला गंभीर इजा झाली.

उपस्थितांनी लागलीच त्याला उपचारासाठी लवेल येथील घरडा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

ही बस चिपळूण येथील ठेकेदाराची असून चालक सुदेश केशव गमरे (५२) रा. वालोपे हा चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे.

अपघातानंतर नातेवाईकांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बुधवारी सकाळी खेड पोलिस स्थानकात बैठक झाली. मात्र त्यात निर्णय न झाल्याने सायंकाळी कंपनीत बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *