गुहागर : खासगी बसमालकाचं प्रवासी तरुणीशी गैरवर्तन

banner 468x60

गुहागर तालुक्यातून मुंबई-विरार असा प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणीशी अश्लील वर्तन केल्याच्या तक्रारीनंतर एका खासगी बसमालक विनायक दणदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (ता. २९) हा प्रकार घडलाय. हा प्रकार शहरात समजताच संतप्त नागरिकांनी संशयित दणदणे याला चांगलाच चोप दिला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, एक तरुणी विरार येथे राहते.

रविवारी (ता. २९) सांयकाळी ती एका ट्रॅव्हल्समधून विरारला जाण्यासाठी बसली होती. रात्री चिपळूण परिसरात बस आली. या वेळी ट्रॅव्हल्स् मालक संशयित विनायक दणदणे हा तरुणीच्या बाजूला येऊन बसला.

याचवेळी त्याला एक फोन आला व तो त्या मुलीसोबत फोनवर बोलून तो बंद केला. त्याने तरुणीला मोबाईलमधून त्या मुलीचे व त्याचे चॅटिंग व फोटो दाखवू लागला.

लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तेव्हा या तरुणीने क्लीनला बोलावून गैरवर्तन करणाऱ्याला माझ्याजवळून उठवा. तेव्हा क्लीनरने ते बसचे मालक विनायक दणदणे असल्याचे सांगितले.

ही बस सोमवारी (ता. ३०) विरार येथे पोहचली. विरारच्या घरी गेल्यानंतर घडलेला प्रसंग या तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर याबाबत विरार येथे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *