दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा झटका देत जामीन फेटाळल्यानंतर आता हायकोर्टात धाव घेतली आहे.

जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी दखल घेत सुनावणी २९ नोव्हेंबरला निश्चित करत ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात कदम यांच्या वतीने अॅड. प्रेरणा गांधी यांनी आव्हान देताना जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या समोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी अॅड. अमित देसाई यांनी विविध मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत ईडीला नोटीस बजावत २९ नोव्हेंबरपर्यंत भूमिक मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















