Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी

banner 468x60

दापोली शहरातील बुरोंडी मार्गावर दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार व पादचारी जखमी झाल्याची घटना घडलीय.

banner 728x90 banner 728x90

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ रोजी रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास अजय पासवान व महेश सहानी, प्रमोद पासवान हे दापोली बाजारपेठेतून खरेदी करून ते काम करत असलेल्या दापोली बुरोंडी मार्गावरील हॉटेल साधना येथे जात होते.

ते किसान भवनजवळ असलेल्या हॉटेल श्रद्धा सबुरीजवळ येताच दापोलीकडून बुरोंडीकडे जाणाऱ्या दुचाकीचे (एमएच ०८, एक्स २८९९) चालक हषिकेश भिकाजी मिसाळ (रा. चंद्रनगर) यांनी महेश सहानी यांना धडक दिली.

या अपघातात सहानी यांच्या उजव्या पायाच्या नडगीला दुखापत झाली असून, पाय मोडला आहे; तर दुचाकीस्वार हृषिकेश मिसाळ हा दुचाकीसह रस्त्यावर पडल्याने त्यांच्याही डोक्याला दुखापत झाली.

दोघांनाही उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजय पासवान यांनी हृषिकेश मिसाळ याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या अपघाताचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *