दापोली : पाणी ओतून मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

banner 468x60

घरी टीव्ही पाहावयास आलेल्याच्या अंगावर पाणी ओतून त्याला मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश मच्छिंद्र ढेपे (रा. वराडकर कॉलेज, दापोली) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २३) दुपारी घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महेश ढेपे यांच्या घरी टीव्ही पाहत असताना फिर्यादी सुरेश शांताराम पाटील (वय ६८, रा. वराडकर कॉलेज, झोपडपट्टी दापोली) यांच्या अंगावर थंड पाणी ओतले व तू घरातून बाहेर जा, असे सांगून हाताने मारहाण करून घराबाहेर काढले.

त्यानंतर महेश ढेपे यांनी सुरेश पाटील यांच्या डोक्यावर तीच खुर्ची मारली. यात सुरेश पाटील यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सुरेश पाटील यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *