Breaking News
राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू चिपळूण : मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून दोन बंधारे, ‘मिशन बंधारे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : 17 महिन्यांच्या आयरिश चक्रवर्तीचा जागतिक विक्रम, 100 मीटर जलतरण 16 मिनिटे 45 सेकंदांत पूर्ण! लांजा : उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान, धुंदरे येथे बांधला बंधारा

दापोली : खातेदाराच्या संमतीशिवाय बँक खात्यामधून सव्वा लाख रुपये काढले

banner 468x60

बँकेतील खात्यामधून १ लाख २५ हजार रुपये खातेदाराच्या संमतीशिवाय काढणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा दर्शन मेहता यांचा वाहतूक व्यवसाय असून त्यांच्या कार्यालयात त्यांची आई आली होती. त्या बँक पासबुक बघत असताना त्यांना या खात्यातून १८ जुलैला १ लाख २५ हजार रुपये काढून घेतल्याचे दिसून आले.

त्यांनी या संदर्भात दर्शन मेहता यांना विचारले असता त्यांनाही त्याची माहिती नव्हती. अखेर अज्ञात व्यक्तीने दर्शना मेहता यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या खात्यातील पैसे काढल्याची

तक्रार त्यांनी प्रथम खेड पोलिस ठाण्यात दाखल करून दापोली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *