Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : दारू विक्रेत्या तिघांना कारावास

banner 468x60

दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भिवबंदर (ता. दापोली) येथील तिघांना दापोलीच्या दिवाणी न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२३ रोजी तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे.

banner 728x90 banner 728x90

भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे, उद्यकांत गोपीचंद मोरे अशी तिघांची नावे आहेत. गेल्या ४० वर्षात प्रथमच दापोलीच्या न्यायालयात दारूबंदी कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस स्थानकातर्फे २०१८ साली ही कारवाई केली होती. त्यानंतर तब्बल ५ वर्षे दापोलीच्या दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू होती.

दापोली तालुक्यातील भिवबंदर गावातील भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे आणि उद्यकांत गोपीचंद मोरे हे गावठी दारूचा धंदा करत असल्याची माहिती दाभोळ सागरी पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईत मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ग) (एफ) (ई) ८१, ८३ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दापोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश महाडिक यांनी तिघांना दोषी ठरवून तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे.

सरकार पक्षातर्फे अॅड. के. व्ही. लिमये यांनी बाजू मांडली. तपासिक अधिकारी म्हणून दीपक कदम, प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते, पैरवी अंमलदार नीलिमा देशमुख यांनी काम पाहिले. दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा देण्याचा निर्णय ४० वर्षात प्रथमच दापोली दिवाणी न्यायालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *