Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : पोक्सो अंतर्गत शिक्षा झालेल्या प्रौढाची आत्महत्या

banner 468x60

पोक्सो अंतर्गत शिक्षा ठोठावलेल्या आंजर्ले-ताडाचा कोंड (ता. दापोली) येथील ५० वर्षीय प्रौढाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रवीण प्रताप भोसले असे त्याचे नाव असून, ही घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली.

प्रवीण भोसले याला खंड सेशन कोर्टाने पोक्सो अंतर्गत १८ महिने कारावास व ५ हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा ठोठावल्याच्या दिवसापासून तो तणावात होता.

banner 728x90 banner 728x90

या तणावातच त्याने घराच्या पोटमाळ्यावर वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोरोना काळात तालुक्यातील गव्हे येथे पीडित मुलगी मैत्रिणींसोबत सायकल चालवत होती. त्यावेळी प्रवीण भोसले याने त्या मुलीला काही अश्लील व्हिडीओ दाखवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात ११ ऑक्टोबर रोजी त्याला पोक्सो अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेच्या तणावाखालीच त्याने आत्महत्या केल्याची नोंद दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस स्थानकात रविवार, २२ ऑक्टोबर रोजी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात थाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *