खेड : 22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

असगणी येथील युवकाने राहत्या घरातील पंख्याला नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २२ वर्षीय युवक रुतीक मनोहर मोहिते असे त्याचे नाव आहे.

खेड तालुक्यातील असगणी बौद्धवाडी येथील युवक रुतीक हा शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी कोणीही नसताना एकटा होता.

घरातील पंख्याला नायलाॅन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती.

घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. रुतीकने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *