खेड : पोलिसांची जुगार अड्डयांवर कारवाई

banner 468x60

तालुक्यात दोन विविध ठिकाणी जुगार अड्डड्यांवर खेड पोलिसांनी धाडी टाकून एकाच दिवशी नऊ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत एकूण ३१ हजार ७७० रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खेड पोलिसांनी गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी पहिली धाड टाकली त्या ठिकाणी २५ हजार ३०० रुपयांची रोकड ताब्यात घेतली व पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन पत्ती हा जुगार त्या ठिकाणी खेळला जात होता त्याच दिवशी भरणे नाका जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी देखील खेड पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ६ हजार ४७० रुपयांची रोकड तसेच चौघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिसांनी जुगार अड्डयांवर टाकलेल्या धाडीत २५ हजार तीनशे रुपयांची रोख रकमेसह नऊ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *