मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना काल सायंकाळी 6.45 वा. घडली.राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता.
या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















